पंचायत पंचांग -- जून

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 जून - पाणलोट सप्ताह 1 ते 7 जून, वनमहोत्सव 1 जून ते 15 ऑगस्ट; 5 जून- पर्यावरण दिन; 10 जून- जागतिक दृष्टिदान सप्ताह 10 जून ते 16 जून; 14 जून - झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी15 जून- जलजन्य साथरोग मोहिम समारोप 15 मे ते 15 जून

·         पर्यावरण दिन साजरा करणे.

-          साथीच्या रोगांसाठी जनावरांना लसीकरण करुन घेणेबाबत नियोजन करणे.
उदाहरणदाखल ठराव :
गावात जनावरांना लाळ, खुरकत रोग झाल्याचे दिसून येत आहे.  सर्व जनावरांना लाळ, खुरकत लस टोचण्याबाबत विनंती पशूसंवर्धन विभागाकडे करण्यास ही सभा मान्यता देत आहे.  सरपंच यांनी पाठपुरावा करुन 100 टक्के लसीकरण करण्याची कार्यवाही करावी.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         बी-बियाण्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे बी-बियाणांची  मागणी करुन वाटप करणे.
·         शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे फळरोप वाटप करणे इतर सार्वजनिक वनीकरणाची लागवड करणे.
·         पाणी पुरवठा योजनांची देखभाल करणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे.
·         ऑडिट नोट पूर्तता रिपोर्टला मासिक सभेची मान्यता घेऊन पंचायत समितीकडे पूर्तता अहवाल पाठविणे.
·         सुधारीत चुली बायोगॅस योजनेसाठी लाभार्थी निवडणे.
·         सौर चुली, सौर कंदिल सौर पथ दिवे यांची माहिती घेणे मागणी करणे.
·         नालाबंडीग यांची देखभाल दुरुस्ती करणे सर्व बंधारे सुस्थितीत ठेवणे.
·         मृदसंधारण विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेणे.

-          पाणी शुध्दीकरणासाठी  टी.सी.एल. खरेदी इतर उपाय योजना करणे.
उदाहरणदाखल ठराव :
ग्रामपंचायतीच्या ताब्यातील नळपाणी पुरवठा योजनेसाठी टी.सी.एल. ची खरेदी करणे आवश्यक आहे.  सध्या 25 किलो स्टॉक आहे, तरी 100 किंलो टी.सी.एल. खरेदी करण्यास त्याचा खर्च ग्राम पाणी पुरवठा निधीतून करण्यास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         डास निर्मूलन मोहीम आखणे.
·         कृषि दिन 1 जुलै रोजी साजरा करण्याबाबत विचार करणे, कृषिदिन समारंभ खर्चास मंजूरी देणे.
·         प्राथमिक शाळेतील प्रवेशाबाबत 100 टक्के पटनोंदणीबाबत आढवा घेणे.
·         सर्व शिक्षा अभियान, महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचा आढावा घेणे.
·         कृषि निविष्ठा दुकानांची तपासणी बाबत आढावा घेणे.
·         पाणी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविणे आढावा घेणे.
·         खरीप पिकांवरील औषधे फवारणीची मोहीम राबविणे, त्यासाठी औषधांची मागणी करणे.
·         पाणलोट सप्ताह साजरा करणेबाबत नियोजन करणे.
·         जनावरांचे लाळ, खुरकत रोगांच्या लसी मागणी नोंदविणे.
·         सर्व शिक्षा अभियानांतर्गत 'लिंक स्कुल' ची माहिती घेणे त्यांची अंमलबजावणी करणे.
·         वैरण, बियांणांची मागणी करणे.
·         13 ते 20  जुलै दरम्यान कापूस बोंडअळी निर्मूलन सप्ताह साजरा करणेबाबत विचार करणे.
·         11 जुलै  - लोकसंख्या दिन साजरा करणेबाबत विचार करणे.
·         मे मधील ग्रामसभेत निवडलेल्या सर्व वैयक्तिक लाभांच्या योजनांचे लाभार्थीचे प्रस्ताव पंचायत समितीसंबंधीत विभागाकडे पाठविणे.
·         जलस्वराज्य, आपलं पाणी, स्वजलधारा या योजनांची माहिती घेणे. पाणी पुरवठा योजनेची मागणी असल्यास ग्रामसभेच्या मान्यतेने अर्ज करणे.




डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन

पंचायत पंचांग -- जुलै

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 जुलै – महाराष्ट्र कृषि दिन कै. वसंतराव नाईक जयंती; 10 जुलै – जागतिक सुरक्षित मातृत्व दिन; 11 जुलै – लोकसंख्या दिन; 13 जुलै – कापूस बोंडअळी निर्मुलन सप्ताह 13 ते 20 जुलै; 26 जुलै – राजर्षी शाहूमहाराज जयंती

-          पाण्याचे नमूने तपासून घेणे पाणी नमूना तपासणी अहवालावर विचार करणे.
उदाहरणदाखल ठराव :

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची तपासणी सहा महिन्यापासून झाल्याचे ग्रामसेवक यांनी निदर्शनास आणून दिले.  सर्व पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक जैविक तपासणी करण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविणे यासाठी ही सभा मान्यता देत आहे.
 ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         जनावरांना औषध उपचार, लसीकरण करणे.
·         फळरोपाची लागवड करुन घेणे.
·         पेरणीचा आढावा खरीप पेरणीचा अहवाल अंतिम करणे.
·         शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे यांची खात्री करणे, रोप संरक्षण, वन संरक्षणाबाबत उपाय योजना करणे.

-          शाळा बाहय मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रवृत्त करणे.
उदाहरणदाखल ठराव :
मुख्याध्यापक प्राथमिक शाळा यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अद्याप 15 मुले शाळेच्या बाहेर आहेत.  प्रत्येक ग्राम पंचायत सदस्यांनी त्यांच्या वार्डातील मुलांच्या पालकांना भेटून शाळेत दाखल करण्याची कार्यवाही करावी असे सभेत ठरले.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         ग्रामपंचायतीचे सर्व खातेदारांना मागणी बील देण्याबाबत आढावा घेऊन बिले रुजू करणे.
·         नवीन आलेले ऑडीट नोट प्रलंबित कांची पूर्तता करणे.
·         15 ऑगस्ट सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम खर्चास मंजूरी घेणे, जादा खर्चास मंजूरी मागणे.
·         अतिवृष्टी झाल्यास पिण्याचे पाणी अशुध्द होऊ नये म्हणून करावयाची उपाययोजना यावर विचार करणे, झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठविणे.
·         वनक्षेत्रातील गवती कुरणाचा लिलाव घेण्याबाबत विचार करणे.
·         यशवंत ग्राम समृध्दी योजनेत भाग घेण्याबाबत विचार करणे लोकवर्गणी गोळा करण्यास मान्यता घेणे.
·         लोकसंख्या दिन साजरा करणे, कटुंबनियोजन कामाचा आढावा घेणे.
·         वीज बील भरण्याबाबत महाराष्ट्र विदयूत महामंडळास सहकार्य करणे. अक्षय प्रकाश योजनेच्या ठरावाबाबत ग्रामसभेस शिफारस करणे.
·         खरीप हंगामात तालूका, जिल्हा राज्यपातळी पीक स्पर्धकांचे प्रवेश अर्ज पाठविणे.
·         शेती वीजपूरवठा याचा आढावा घेणे.
·         विविध कार्यक्रमातील अपूर्ण कामाचा आढावा घेणे.
·         ग्रामपंचायत सदस्यांकडील कर वसूलीचा आढावा घेणे.

-          जिल्हा ग्रामविकास निधीत 5 टक्के वर्गणी भरणा करणे.
उदाहरणदाखल ठराव :
जिल्हा ग्रामविकास निधीत मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार एकूण उत्पन्नाच्या 5 टक्के म्हणजे रु. 22,500/- जिल्हा ग्राम विकास वर्गणी म्हणून भरण्यास मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         बोअर विद्युत पंप वर्गणी भरणे.
·         स्नतपान सप्ताह (1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट) साजरा करण्याबाबत नियोजन करणे.
·         पीक कापणी प्रयोगासाठी शेताची निवड करणे.
·         खरीप हंगामातील अंतिम पेरणी अहवाल पाठविणे.
·         शालेय स्वच्छता आरोग्य शिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेणे.


डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन