पंचायत पंचांग -- जून

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 जून - पाणलोट सप्ताह 1 ते 7 जून, वनमहोत्सव 1 जून ते 15 ऑगस्ट; 5 जून- पर्यावरण दिन; 10 जून- जागतिक दृष्टिदान सप्ताह 10 जून ते 16 जून; 14 जून - झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी15 जून- जलजन्य साथरोग मोहिम समारोप 15 मे ते 15 जून

·         पर्यावरण दिन साजरा करणे.

-          साथीच्या रोगांसाठी जनावरांना लसीकरण करुन घेणेबाबत नियोजन करणे.
उदाहरणदाखल ठराव :
गावात जनावरांना लाळ, खुरकत रोग झाल्याचे दिसून येत आहे.  सर्व जनावरांना लाळ, खुरकत लस टोचण्याबाबत विनंती पशूसंवर्धन विभागाकडे करण्यास ही सभा मान्यता देत आहे.  सरपंच यांनी पाठपुरावा करुन 100 टक्के लसीकरण करण्याची कार्यवाही करावी.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         बी-बियाण्यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे बी-बियाणांची  मागणी करुन वाटप करणे.
·         शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे फळरोप वाटप करणे इतर सार्वजनिक वनीकरणाची लागवड करणे.
·         पाणी पुरवठा योजनांची देखभाल करणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे.
·         ऑडिट नोट पूर्तता रिपोर्टला मासिक सभेची मान्यता घेऊन पंचायत समितीकडे पूर्तता अहवाल पाठविणे.
·         सुधारीत चुली बायोगॅस योजनेसाठी लाभार्थी निवडणे.
·         सौर चुली, सौर कंदिल सौर पथ दिवे यांची माहिती घेणे मागणी करणे.
·         नालाबंडीग यांची देखभाल दुरुस्ती करणे सर्व बंधारे सुस्थितीत ठेवणे.
·         मृदसंधारण विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेणे.

-          पाणी शुध्दीकरणासाठी  टी.सी.एल. खरेदी इतर उपाय योजना करणे.
उदाहरणदाखल ठराव :
ग्रामपंचायतीच्या ताब्यातील नळपाणी पुरवठा योजनेसाठी टी.सी.एल. ची खरेदी करणे आवश्यक आहे.  सध्या 25 किलो स्टॉक आहे, तरी 100 किंलो टी.सी.एल. खरेदी करण्यास त्याचा खर्च ग्राम पाणी पुरवठा निधीतून करण्यास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         डास निर्मूलन मोहीम आखणे.
·         कृषि दिन 1 जुलै रोजी साजरा करण्याबाबत विचार करणे, कृषिदिन समारंभ खर्चास मंजूरी देणे.
·         प्राथमिक शाळेतील प्रवेशाबाबत 100 टक्के पटनोंदणीबाबत आढवा घेणे.
·         सर्व शिक्षा अभियान, महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचा आढावा घेणे.
·         कृषि निविष्ठा दुकानांची तपासणी बाबत आढावा घेणे.
·         पाणी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविणे आढावा घेणे.
·         खरीप पिकांवरील औषधे फवारणीची मोहीम राबविणे, त्यासाठी औषधांची मागणी करणे.
·         पाणलोट सप्ताह साजरा करणेबाबत नियोजन करणे.
·         जनावरांचे लाळ, खुरकत रोगांच्या लसी मागणी नोंदविणे.
·         सर्व शिक्षा अभियानांतर्गत 'लिंक स्कुल' ची माहिती घेणे त्यांची अंमलबजावणी करणे.
·         वैरण, बियांणांची मागणी करणे.
·         13 ते 20  जुलै दरम्यान कापूस बोंडअळी निर्मूलन सप्ताह साजरा करणेबाबत विचार करणे.
·         11 जुलै  - लोकसंख्या दिन साजरा करणेबाबत विचार करणे.
·         मे मधील ग्रामसभेत निवडलेल्या सर्व वैयक्तिक लाभांच्या योजनांचे लाभार्थीचे प्रस्ताव पंचायत समितीसंबंधीत विभागाकडे पाठविणे.
·         जलस्वराज्य, आपलं पाणी, स्वजलधारा या योजनांची माहिती घेणे. पाणी पुरवठा योजनेची मागणी असल्यास ग्रामसभेच्या मान्यतेने अर्ज करणे.




डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन