ग्रामीण पर्यावरण नियोजनाद्वारे शाश्वत विकासासाठी ग्रामपंचायतीची भूमिका

·         गावपातळीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती अद्ययावत ठेवणे.
·         वनदिन, हवामानदिन, पर्यावरणदिन, वसुंधरा दिन वृक्षारोपण दिन साजरा करणे.
·         अपारंपारिक उर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सुधारीत चुली, बायोगॅस, सौर चूल, सौर पथदिवे  इ. कार्यक्रम राबविणे.
·         वैयक्तिक शौचालये, सांडपाणी निर्मूलन अंतर्गत गटारे, शोषखड्डा, परसबाग इत्यादी कार्यक्रम हाती घेणे राबविणे.
·         चराईबंदी, कुऱ्हाडबंदी कार्यक्रम राबविण्यासाठी ग्रामसभा, मासिकसभा माध्यमातून लोकांचा पांठिंबा मिळविणे.
·         नर्सरी, रोपवाटीका कार्यक्रम हाती घेणे.
·         पर्यावरण विकासाच्या दृष्टिने लोकांमध्ये जनजागृती कार्यक्रम हाती घेणे, शाळेचा सहभाग प्रामुख्याने घेणे.
·         जवाहर  ग्रामसमृध्दी योजना हरीयाली कार्यक्रमातून पडीक जमीनीचा विकास, जलसंधारण, वृक्ष संवर्धन कार्यक्रम हाती घेणे.
·         पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात जनतेचा सहभाग विशेषत: महिलांचा सहभाग घेणे.
·         फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण कार्यक्रम घेणेउत्तम शेतकरी निवडणे त्यांना प्रोत्साहन देणे.
·         ग्रामपंचायतीच्या जमीनीवर गायरान क्षेत्रात वनीकरण करणे.
·         पर्यावरण मित्रमंडळ, शेतकरी मंडळ स्थापन करणे.
·         शेतकरी मेळावा, कृषी पशुपक्षी प्रदर्शन, वृक्षदिंडी इ. कार्यक्रम हाती घेणे.
·         वन पर्यावरण संदर्भात असलेल्या कायद्याची माहिती जनतेला देणे त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे.
·     महिला मंडळे, स्वसंहाय्यता बचत गटाच्या महिलांचा सहभाग घेणे, महिलांना भाजीपाला निर्मिमी, परसबाग, इंधनबचत याबाबत प्रशिक्षण घेणे.
·         खाजगी क्षारयुक्त पडीक जमिनीच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
·      शेतकऱ्यांना (सुधारित बियाणे, कीड व्यवस्थापन पध्दती, सेंद्रिय खताचा वापर, गांडूळ खत प्रसार) नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे,
·         प्लॅस्टिकच्या वापराबाबतप्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी बाबत प्रयत्न करणे.
·         पर्यावरण संरक्षणासाठी विविध प्रकल्प, कार्यक्रमासाठी ग्रामनिधीतून तरतूद करणे.
·    प्रौढ नागरिकांना उघडयावर शौचास बसविणेस ग्रामसभांद्वारे बंदी घालणे, यासाठी वैयक्तिक सार्वजनिक शौचालय बांधकामास प्रोत्साहन देणे.
·         आकाशवाणी, दूरदर्शनपोस्टर्स इ. प्रभावी प्रसिध्दी माध्यमांद्वारे प्रसिध्दी प्रचार करणे.
·         पाणी वापर नियोजनाबाबत गावपातळीवर जनजागृती करणे.
·         शिवकालीन पाणी साठवण योजनेअंतर्गत पावसाचे पाणी संकलित करुन पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे.
·         फलोत्पादन कार्यक्रमासाठी जनजागृती करुन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रवृत्त करणे.
·         नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारीत महिलांसाठी स्वयं-रोजगार निर्माण करुन शाश्वत ग्रामविकास साधण्यासाठी तातडीच्या उपाय योजना करणे.
·         विविध जैवीक संसाधन विकास करणे.
·         गावपातळीवरील नैसर्गिक साधन संपत्ती जतन करणे.
·    शासकिय वन विभाग, सामाजिक वनीकरण, मृदसंधारण विभाग, महाराष्ट्र जल प्राधिकरण, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, ग्राम विकास विभाग, स्वसहाय्यता बचत गट यांना सहकार्य करावे.

·    आपल्या गावास गावातील नैसर्गिक साधन संपत्ती, गावाचा शाश्वत विकास, पर्यावरणीयदृष्टया स्वच्छ गाव, याबाबत अभिमान असावा.



ही माहिती संवाद व क्षमता विकास कक्ष, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन आणि परिवेश: पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी  येथील अनुक्रमे डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे व डॉ. भारत भुषण, प्राध्यापक, पर्यावरण नियोजन या दोघांतर्फे समन्वयीत कार्यक्रमाच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामस्तरावरील पर्यावरण नियोजन व शाश्वत विकासासाठी तयार केलेल्या पंचायत पंचांग - ग्रामपंचायतींसाठी मासिक मार्गदर्शिका या पुस्तिकेतून घेतली आहे.