ग्रामसभा/ पंचायतीच्या बैठका (मासिक सभा)

(मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 36)

·         प्रत्येक ग्रामपंचायतीची मासिक सभा महिन्यातून एकदा भरेल.
·         आवश्यकता वाटल्यास पंचायतीची खास सभा बोलावता येईल.
·         मासिक सभेची नोटीस प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यास विहित पद्धतीने बजावली पाहिजे व ग्रामपंचायत सूचना फलकावर लावली पाहिजे.
·         सभेचे अध्यक्ष सरपंच असतील व त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्ष असतील.
·         पंचायतीच्या सर्व सदस्यांनी नियमितपणे बैठकांना उपस्थित राहून कामकाजात भाग घेतला पाहिजे.
·         गणपूर्ती (कोरम) सदस्यांच्या एकूण संख्येच्या निम्मी.
·         विषय पत्रिकेनुसार सभेचे कामकाज चालवावे.
·         अध्यक्षांच्या परवानगीने विषय पत्रिके व्यतिरिक्त विषयांवर चर्चा करून निर्णय घेता येईल.
·         महत्वाचे व आर्थिक विषयांचा समावेश विषय पत्रिकेत असावा.
·         सभा सर्व लोकांसाठी अध्यक्षांच्या परवानगीने खुली ठेवता येईल.
·         सभेपुढे येणा-या विषयांवर बहुमताने निर्णय घ्यावा.
·         पंचायतीच्या प्रत्येक सभेचे कामकाज बांधणी केलेल्या पुस्तकातून लिहून ठेवले पाहिजे.
·         सभेच्या कामकाजात अडथळा येईल असे वर्तन करता कामा नये.

Panchayat Panchaang (1) - Monthly meetings (1) - ग्रामसभा/ पंचायतीच्या बैठका


Panchayat Panchaang (2) - Monthly meetings (2) - ग्रामसभा/ पंचायतीच्या बैठका



ही माहिती पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई आणि राज्य ग्रामीण विकास संस्था, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे यांचेतर्फे पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज योजना – प्रशिक्षणातून विकास अभियान: ग्रामपंचायत सदस्य – क्षमतावृद्धी प्रशिक्षण या वाचन साहित्य पुस्तिकेमधून घेतली आहे. या पुस्तिकेची प्रथम आवृत्ती: डिसेंबर 2010 व द्वितीय आवृत्ती: मार्च 2013.