(मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 45
- ग्रामसूची -1)
·
घरगुती उपयोगासाठी व
जनावरांसाठी पाणी पुरवठा करणे.
·
गावात दिवा-बत्तीची
व्यवस्था करणे.
·
ग्रामस्थांचे आरोग्य रक्षण
व वैद्यकीय मदतची तरतूद करणे.
·
गावाची नियमित साफसफाई करणे
व गाव स्वच्छ ठेवणे.
·
खाद्य पदार्थांच्या
दुकानांचे नियमन करणे.
·
मानवी विष्ठा, जनावरांचे
मलमुत्र, घन कचरा व सांडपाणी यांचे व्यवस्थापन करणे.
·
ग्रामस्थ व जनावरे
यांचेमध्ये साथ रोगांचा उद्रेक व फैलाव होवू नये यासाठी प्रतिबंध करणे.
·
दहन व दफन भूमीची व्यवस्था
करणे.
·
सार्वजनिक रस्ते, गटारे,
बांधकाम, पूल, क्रिडांगणे, धर्मशाळा बांधणे, सार्वजनिक उपवने (बागबगीचे) तयार करणे व
सुस्थितीत ठेवणे.
·
वृक्षारोपण करणे व त्यांची
जोपासना करणे.
·
इमारत बांधकाम परवानगी
देणे.
·
शिक्षणाचा प्रसार करणे.
·
प्राथमिक शाळेसाठी इमारतीची
व्यवस्था व खेळाची मैदाने तसेच शालेय साहित्य पुरवणे.
·
ग्रामीण विमा.
·
सार्वजनिक वाचनालय चालवणे.
·
गावातील शेती सुधारणेसाठी
प्रयत्न करणे.
·
जनावरांची (पशुधनांची) जोपासना व
त्यांच्या पैदाशीची काळजी घेणे.
·
कुटीरोद्योग, लघुउद्योग,
ग्रामोद्योग (स्वयंसहायता बचत गट) यांना चालना देणे.
·
सहकारी शेतीचे संवर्धन
करणे.
·
अपंग, निराश्रीत, आजारी
यांना सहाय्य करणे.
·
दारू बंदीस उत्तेजन देणे.
·
अस्पृश्यता निर्मुलन करणे.
·
लाच-लुचपतीचे उच्चाटन करणे.
·
जुगारास आळा घालणे.
·
गावात तंटामुक्ती करणे.
·
महिला व मुलांच्या संघटना व
कल्याण (महिला मंडळे व युवक
मंडळे, इ.)
·
गावात राखण व पहारा ठेवणे.
·
उपद्रवकारक किंवा धोकादायक
व्यवसाय किंवा व्यापार यांचे नियमन करणे.
ही माहिती पंचायती राज
मंत्रालय, भारत सरकार, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय,
मुंबई आणि राज्य ग्रामीण विकास संस्था, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,
पुणे यांचेतर्फे पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज योजना – “प्रशिक्षणातून
विकास” अभियान: ग्रामपंचायत सदस्य – क्षमतावृद्धी
प्रशिक्षण या वाचन साहित्य पुस्तिकेमधून घेतली आहे. या पुस्तिकेची प्रथम आवृत्ती:
डिसेंबर 2010 व द्वितीय आवृत्ती: मार्च 2013.