73वी घटना दुरूस्ती ठळक वैशिष्ठ्ये

·         पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा
·         जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत याप्रमाणे त्रिस्तरीय पद्धत
·         ग्रामसभांची स्थापना बंधनकारक
·         निवडणूक आयोगाची व वित्त आयोगाची स्थापना
·         पंचायतींची मुदत पाच वर्षे
·         दर पाच वर्षांनी निवडणूका घेणे बंधनकारक
·         एखादी पंचायत बरखास्त केल्यास सहा महिन्यात निवडणूका घेणे आवश्यक
·         महिलांसाठी एक तृतियांश (33.33%) जागांचे आरक्षण
·         अनुसूचित जाती-जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण
·         आरक्षण सरपंच, सभापती, पंचायत समिती व अध्यक्ष, जिल्हा परिषद या पदांनाही लागू

ग्रामपंचायत रचना

·         लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17
·    लोकसंख्येच्या प्रमाणात अनु. जाती., अनु. जमाती, नागरीकाचा मागास प्रवर्ग, महिला यांचेसाठी आळीपाळीने राखीव जागा ठेवणेची तरतूद आहे.
·         ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतात.



ही माहिती पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई आणि राज्य ग्रामीण विकास संस्था, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे यांचेतर्फे पुरस्कृत राष्ट्रीय ग्राम स्वराज योजना – प्रशिक्षणातून विकास अभियान: ग्रामपंचायत सदस्य – क्षमतावृद्धी प्रशिक्षण या वाचन साहित्य पुस्तिकेमधून घेतली आहे. या पुस्तिकेची प्रथम आवृत्ती: डिसेंबर 2010 व द्वितीय आवृत्ती: मार्च 2013.