मंत्री, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्यातर्फे प्रस्तावनेचा संक्षिप्त गोषवारा
73 व्या घटना दुरूस्तीमुळे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. ग्रामसभेस विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत. गावपातळीवर नियोजन करून लोकसहभागातून शाश्वत विकास साधण्याची गरज आहे. संत गाडगेबाबा ग्राम सवच्छता अभियानामुळे महाराष्ट्रात एक मोठी लोकसहभागाची चळवळ उभी राहिलेली दिसत आहे. राज्यात जलस्वराज्रू, आपलं पाणी, स्वजलधारा, संपूर्ण स्वच्छता अभियान, यशवंतर ग्राम समृद्धी योजना, शिवकालीन पाणी साठवण योजना इ. योजना लोकसहभागातून गावपातळीवर राबविण्यात येत आहे. पर्यावरण व विकास केंद्र, यशदा व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संवाद व क्षमता विकास कक्ष यांच्या वतीने ग्रामपंचायती समोरील मासिक सूची पंचायत पंचांग ही पुस्तिका काढून ग्रामपंचायतीला एक दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तिकेचा उपयोग निश्चितच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत गावपातळीवरील कार्यकर्त्यांना होणार आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन करताना मला विशेष आनंद होत आहे. यशदामध्ये पर्यावरण व विकास केंद्राकडून 100 गावे निवडून पर्यावरण नियोजनाद्वारे शाश्वत विकास करण्याचा जो स्तूत्य उपक्रम राबविणार आहे त्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा.
ग्रामपंचायतीकडे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार कायद्याने 78 विषय दिलेले आहेत. पाणी व स्वच्छता क्षेत्रातील सुधारित धोरणानुसार नियोजन, अंमलबजावणी, देखभाल व दुरूस्तीचे सर्व अधिकार गावपातळीवर दिलेले आहेत. यापुढे गावाने पुढाकार घेऊन आपल्या गावात लोकसहभागातून विविध विकास योजना राबवून स्वयंपूर्ण गाव करण्यासाठी प्रयत्न करावा.
मंत्री, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र शासन, मुंबई,दिनांक 3 एप्रिल 2005
राज्यमंत्री, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्यातर्फे प्रस्तावनेचा संक्षिप्त गोषवारा
पर्यावरण व विकास केंद्र, यशदा व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील संवाद व क्षमता विकास कक्ष यांच्या वतीने पंचायत पंचांग ग्रामपंचायतींची मासिक मार्गदर्शिका ही पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. या पुस्तिकेचा निश्चित चांगला उपयोग ग्रामपंचायतांना होणार आहे. ग्रामपंचायतींकडे मुंबई ग्रामपंचायत अधिनियमान्वये मिळालेल्या सर्व विषयांकडे लक्ष देण्यात ग्रामपंचायतींना मदत होणार आहे.
राज्यमंत्री, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र शासन, मुंबई, दिनांक 3 एप्रिल 2005