पंचायत पंचांग -- मे

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 मे – ग्रामसभा, महाराष्ट्र व कामगार दिन, हिवताप नियंत्रण सप्ताह 1 ते 7 मे; 8 मे- जागतिक रेडक्रॉस दिन, रविंद्रनाथ टागोर जयंती; 9 मे- कर्मवरी भाऊराव पाटील, स्मृति दिन; 11 मे- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन; 12 मे- जागतिक परिचारिका दिन; 13 मे- सैनिक दिन; 15 मे- जलजन्य साथरोग मोहिम 15 मे ते 15 जून; 17 मे- दूरसंचार दिन; 20 मे- पशूसंवर्धन दिन; 21 मे- दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन; 24 मे- राष्ट्रीय फूल दिन; 27 मे- पंडित जवाहरलाल नेहरू स्मृति दिन; 28 मे – स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती.

·         ग्रामसभेपुढील विषयावर मासिक सभेत चर्चा करणे.
·         पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरी, तळयातील गाळ काढण्याच्या कामास आर्थिक खर्चास मंजूरी देणे.

-          अंगणवाडी, प्राथमिक शाळा, सार्वनिक इमारतींची पावसाळयापूर्वी किरकोळ दुरुस्तीस्तव खर्चास मंजूरी ठराव देणे.
उदाहरणदाखल ठराव :
गावातील अंगणवाडी कं. 111 च्या इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने बांधकाम विभाग पंचायत समितीने  रु. 11,000/- चे अंदाजपत्रक तयार केले आहे. यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च ग्रामनिधीतून महिला बालकल्याण या लेखाशिर्षकातून करण्यास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेची माहिती देणे आढावा घेणे. 
·         ग्रामसभेमध्ये इंदिरा आवास घरकुल, जवाहर ग्राम समृध्दी योजनेमध्ये 77.5 टक्के 22.5 टक्के कामाची निवड, वैयक्तिक योजनेचे लाभार्थी, मूलभूत सुविधा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेतील लाभार्थी, बाजार गाळेचे लाभार्थी यांची निवड करणे, समाज कल्याण महिला बाल कल्याण योजनेसाठी लाभार्थी  निवडणे इ. विषय ठेवणे याबाबत चर्चा करणेत येऊन ग्रामसभेस शिफारस करणे.

-          वस्ती शाळांची गरज असल्यास प्रस्ताव तयार करणे.
उदाहरणदाखल ठराव :
रामराव नगर या वस्तीत 15 मुले 5 ते 10 वयोगटातील आहेत.  गावापासून ही वस्ती 3 कि.मी. अंतरावर आहे.  तरी रामराव नगर येथे वस्ती शाळा घेण्याबाबत प्रस्ताव जिल्हा परिषदकडे पाठविण्यास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         गाव तेथे खोडा मिळणेबाबत ठराव करणे (नसल्यास).
·         ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशिक्षणाबाबतचा आढावा घेणे.
·         वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन कार्यवाहीचे स्वरुप ठरविणे.
·         पेंडिंग ऑडिट नोट प्रलंबीत शक पूर्तता करणे.
·         आवश्यकतेनुसार लागणारे टी.सी.एल. खरेदी करुन ठेवणे.
·         मागील वर्षाचा प्रशासन अहवाल विकास कामाचा जमाखर्च ग्रामसभेपुढे ठेवणे.
·         पर्यावरण ग्रामीण विकास यांचा प्राध्यान्याने विचार करणे विकास आराखडा बनविणे.
·         झाडे लावणेसाठी जागेची निवड करुन नियोजन करणे.
·         पर्यावरण दिवस साजरा करण्याबाबत नियोजन करणे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
·         फळबागा लागवडीसाठी लाभार्थींची निवड शिफारस करणे.
·         परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती कार्यक्रम आखणे.
·         रासायनिक खते, बियाणे, औषधे या कृषिनिविष्ठा परवानाधारक दुकानांच्या तपासणीचा आढावा घेणे, नमूने काढून विश्लेषणासाठी पाठविणेबाबत पंचायत समितीला कळविणे निविष्ठा आढावा घेणे.
·         खरिपाचे नियोजन करणे, शेतकरी मेळावे, चर्चा सत्राचे आयोजन करणे.
·         कंपोस्ट गांडूळखत तंत्रज्ञानाची माहिती देणे.
·         एड़स जनजागृतीबाबत कार्यक्रम हाती घेणे.
·         लसीकरणाचा आढावा घेणे.
·         पूरनियंत्रणाचा आढावा घेणे नावाडयांची यादी करणे.
·         पाणी शुध्दीकरण वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या लाल - हिरव्या कार्डांचा आढावा घेणे.
·         खातेदारांना जमा-खर्चाची माहिती देणे.
·         जनावराच्या लसीची मागणी लसीकरण करुन घेणे.

·         स्वच्छता, पाणी जलसंधारण या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची निम्न व्यावसायिक म्हणून निवड करणे त्यांना कामाची संधी उपलब्ध करुन देणे. 


डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन