पंचायत पंचांग -- एप्रिल


या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
5 एप्रिल – राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन, 7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन, 10 एप्रिल- डॉ. पंजाबराव देशमुख पुण्यतिथी, 14 एप्रिल – भारतरत्न डॉ. बाबासाहेत आंबेडकर जयंती समता दिन, 20 एप्रिल- वसुंधरा दिन, 30 एप्रिल- समता पंधरवडा समारोप (14 – 30 एप्रिल) महिला ग्रामसभा

·         चालू आर्थिक वर्षातील ग्राम पंचायत कराची मागणी ठरावाने कायम करणे.
·         अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या कामाला प्रशासकीय मान्यता देणे.

-          जाहिर केलेल्या लिलावास मान्यता घेणे.
उदाहरणादाखल ठराव :
ग्रामपंचायतीच्या सर्व्हे नं. 120  मधील 1/2  एकर आंब्याच्या बागातील आंबाफळाचे लिलाव रितसर पध्दत अवलंबून केलेली आहे. 'अबकयाने ते 20,000 रुपयास घेण्याचे ठरविले आहे.  ते मंजूरी देताच रक्कम ग्रामपंचायतीकडे भरणार आहेत त्यास ही मासिक सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक  कनप, अनुमोदक  रासप.

·         मागणी वर्षात नवीन बांधलेल्या घरांच्या नोंदी घेणेबाबत.
·         ठेवी, रोखे, बचतपत्रे इ. ुंतवणुकीचा आढावा व्याजाची माहिती घेणे.
·         मत्सबीजाची मागणी करणे.
·         ब्लिचिंग पावडर खरेदी, पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांच्या दुरुस्तीची मोहीम आखणे.
·         पाण्याचे अंदाजपत्रक अवलोकनी घेऊन पीक आराखडा तयार करणे.
·         बियाणे बदलणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणेबी-बियाणे बद्दल नवीन सुधारित जाती यावर चर्चा करणे, बियांणांची मागणी नोंदविणे.
·         झाडांना पाणी देणे झाडे लावण्यासाठी नवीन शेतकरी यादी तयार करणे.
·         पंचायत समितीकडे खरीप हंगामाकरीता खते, बियाणे, किटकनाशके, सुधारित औजारे, फळझाडांच्या रोपांची मागणी करणे.
·         खुरपणीच्या कामाचा तसेच रोगराईचा आढावा घेणे.

-   ग्रामपंचायतीने काढलेल्या जिल्हा ग्रामविकास निधी कर्जाचा आढावा घेणे.
उदाहरणादाखल ठराव :
  ग्रामपंचायतीने टॅक्टरसाठी 3 लाख रुपये कर्ज घेतले होते.  गतवर्षीपर्यंत 1.20 लाख रुपयांची परतफेड केलेली आहे.  चार वर्षात राहिलेले 1.80 लाख रुपये परतफेड करणेचे आहे.  या वर्षाची मागणी रुपये 50,000 ची आहे.  जिल्हा परिषदेने पाठविलेली माहिती बरोबर असून या वर्षाची मागणी जिल्हा परिषदेकडे भरण्यास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे पाणी पुरवठा निधीकडील रु. 150/- चे आत ग्राम निधीकडील रु. 50/- चे हात शिल्लक ठेवणेबाबत ठराव करणे.
·         ज्या ग्रामपंचायतीकडे वसूली क्लार्क आहेत त्यांनी ग्रामपंचायत ठराव घेऊन वसूली अधिकार देणेबाबत ठरावाने कार्यवाही करणे जामिन कदबा करुन घेणे.
·         मागील वर्षाचा प्रशासन अहवाल सादर करणे.
·         चालू वर्षाच्या वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणीची  रुपरेषा ठराविणे.

-          1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, साजरा करण्याचे नियोजन करणे.
उदाहरणादाखल ठराव :
1 मे हा दिन महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्याचे आहे.  या दिवशी झेंडावंदनानंतर  हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा  सत्कार करण्याचे ठरविले आहे.  यासाठी रु. 500/- पर्यंत खर्च येणार आहे.  प्रस्तावित कार्यक्रम घेण्यास 500/- रु. च्या खर्चास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         पाणलोट विकासात गावाचे योगदान ठरविणे महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान राबविणे.
·         विविध शासकीय योजनांची माहिती देणे प्रचार करणे.
·         जलस्वराज्य / आपलं पाणी / स्वजलधारा योजनांची माहिती घेणे. 
·         मागील वर्षी अपूर्ण हाती घेतलेल्या विकास कामाच्या प्रगतीचा आढावा घेणे, (वित्त आयोग, जवाहर ग्राम समृध्दी, घरकुले, वैधानिक विकास मंडळ इ.)
·         ग्रामपंचायत नं. 25, 26 27 प्रमाणे सर्व मालमत्तेची तपासणी करणे, तसेच विविध फंडातून पूर्ण झालेल्या कामाच्या नोंदी संबंधित रजिस्टरवर घेणे.
·         नमूना नं. 8, 9, पूर्ण करुन खातेदारांना कर मागणी बील देणे.
·         डेडस्टॉक साठा नोंदवहीतील साहित्याची पडताळणी करणे.
·         6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण शाळेत पटनोंदणी करणे.
·         कुटुंब कल्याण सर्व्हे करुन घेणे.
·         गावात स्थापना केलेल्या बचत गटांचा आढावा घेणे. 



डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन