या
महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 जुलै – महाराष्ट्र कृषि दिन कै.
वसंतराव नाईक जयंती; 10 जुलै – जागतिक सुरक्षित मातृत्व दिन;
11 जुलै – लोकसंख्या दिन; 13 जुलै – कापूस
बोंडअळी निर्मुलन सप्ताह 13 ते 20 जुलै; 26 जुलै – राजर्षी
शाहूमहाराज जयंती
-
पाण्याचे नमूने तपासून
घेणे व पाणी नमूना
तपासणी अहवालावर विचार करणे.
उदाहरणदाखल ठराव :
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची तपासणी सहा महिन्यापासून न झाल्याचे ग्रामसेवक यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविणे यासाठी ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर. सूचक - कनप, अनुमोदक रासप.
·
जनावरांना औषध उपचार, लसीकरण
करणे.
·
फळरोपाची लागवड करुन
घेणे.
·
पेरणीचा आढावा व खरीप
पेरणीचा अहवाल अंतिम करणे.
·
शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे
यांची खात्री करणे, रोप संरक्षण, वन संरक्षणाबाबत
उपाय योजना करणे.
-
शाळा बाहय मुलांना
शाळेत दाखल करण्यासाठी प्रवृत्त
करणे.
उदाहरणदाखल ठराव :
मुख्याध्यापक प्राथमिक शाळा यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अद्याप 15 मुले शाळेच्या बाहेर आहेत. प्रत्येक
ग्राम पंचायत सदस्यांनी त्यांच्या वार्डातील मुलांच्या पालकांना भेटून शाळेत दाखल करण्याची कार्यवाही करावी असे सभेत ठरले.
ठराव सर्वानुमते मंजूर. सूचक - कनप, अनुमोदक
रासप.
·
ग्रामपंचायतीचे सर्व
खातेदारांना मागणी बील देण्याबाबत
आढावा घेऊन बिले रुजू
करणे.
·
नवीन आलेले ऑडीट
नोट व प्रलंबित शंकांची पूर्तता करणे.
·
15
ऑगस्ट सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम
खर्चास मंजूरी घेणे, जादा खर्चास
मंजूरी मागणे.
·
अतिवृष्टी झाल्यास पिण्याचे
पाणी अशुध्द होऊ नये
म्हणून करावयाची उपाययोजना यावर
विचार करणे, झालेल्या नुकसानीचा
अहवाल पाठविणे.
·
वनक्षेत्रातील गवती
कुरणाचा लिलाव घेण्याबाबत विचार
करणे.
·
यशवंत ग्राम समृध्दी
योजनेत भाग घेण्याबाबत विचार
करणे व लोकवर्गणी गोळा
करण्यास मान्यता घेणे.
·
लोकसंख्या दिन साजरा
करणे, कटुंबनियोजन कामाचा आढावा घेणे.
·
वीज बील भरण्याबाबत
महाराष्ट्र विदयूत महामंडळास सहकार्य
करणे. अक्षय प्रकाश योजनेच्या
ठरावाबाबत ग्रामसभेस शिफारस करणे.
·
खरीप हंगामात तालूका, जिल्हा
व राज्यपातळी पीक स्पर्धकांचे प्रवेश
अर्ज पाठविणे.
·
शेती वीजपूरवठा याचा
आढावा घेणे.
·
विविध कार्यक्रमातील अपूर्ण
कामाचा आढावा घेणे.
·
ग्रामपंचायत सदस्यांकडील
कर वसूलीचा आढावा घेणे.
-
जिल्हा ग्रामविकास निधीत 5 टक्के
वर्गणी भरणा करणे.
उदाहरणदाखल ठराव :
जिल्हा ग्रामविकास निधीत मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार एकूण उत्पन्नाच्या 5 टक्के म्हणजे रु. 22,500/-
जिल्हा ग्राम विकास वर्गणी म्हणून भरण्यास मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर. सूचक - कनप, अनुमोदक
रासप.
·
बोअर व विद्युत
पंप वर्गणी भरणे.
·
स्नतपान सप्ताह (1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट)
साजरा करण्याबाबत नियोजन करणे.
·
पीक कापणी प्रयोगासाठी
शेताची निवड करणे.
·
खरीप हंगामातील अंतिम
पेरणी अहवाल पाठविणे.
·
शालेय स्वच्छता व आरोग्य
शिक्षण कार्यक्रमाचा आढावा
घेणे.
डॉ. भारत भुषण, पर्यावरण
व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे
डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे,
महाराष्ट्र शासन