पंचायत पंचांग -- ऑगस्ट

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 ऑगस्ट – वनमहोत्सव दिन, लोकमान्य टिळक पु.तिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट; 5 ऑगस्ट – हत्तीरोग नियंत्रण दिन; 7 ऑगस्ट – रविंद्रनाथ टागोर स्मृतिदिन; 9 ऑगस्ट – ऑगस्ट क्रांती दिन; 14 ऑगस्ट – संस्कृत दिन, महिला ग्रामसभा; 15 ऑगस्ट – ग्रामसभा, स्वातंत्र्य दिन

·         15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत लाभार्थींची निवड करुन ठरावास मंजूरी घेणे.
·         जेष्ठ नागरिक यांना मिळणाऱ्या सेवा त्यांचा ग्रामविकासातील सहभाग यावर चर्चा करणे.

-          जवाहर ग्राम समृध्दी योजनेतून निवडलेले काम प्रशासकीय मान्यता घेऊन सुरु करणे.
उदाहरणदाखल ठराव :
जवाहर ग्राम समृध्दी योजनेतून 100 मिटर गटार बांधकामास ग्रामसभेने मान्यता दिलेली आहे.  सदरचे काम सुरु करण्यास ही सभा मान्यता देत आहे.  मजूरांना नियमितपणे मजूरी धान्य देण्याची कार्यवाही व्हावी.
 ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप.

·         मागासवर्गीय समाजाचे उन्नतीसाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे शे. 15 टक्के खर्चाचे नियोजन करणे.
·         महिला बाल कल्याण ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे शे. 10 टक्के खर्चाचे नियोजन करणे.
·         ग्राम पंचायत कर वसूली पाणीपट्टीचा आढावा घेणे वसूलीस गती देणे.
·         प्रलंबित ऑडिट शकाची पूर्तता करुन ग्राम पंचायत ठरावाने मंजूर करुन मंजूरीस पंचायत समितीकडे पाठविणे.
·         गायराने, खाजगी जागा, रस्ते लगत लावलेल्या झाडांच्या संरक्षणाची काळजी घेणे.
·         रब्बी हंगामाकरीता बियाणे सुधारीत औजारे, किटकनाशके, खते मागविणे.
·         5 सप्टेंबर शिक्षक दिन, 8 सप्टेंबर साक्षरता दिन 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, साजरा करणेबाबत नियोजन करणे.
·         वनराई बंधारे घेणेबाबत नियोजन करणे श्रमदानातून बंधारे बांधणे.
·         एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा 'योजना अंमलबजावणी नियंत्रण कमिटीकडून आढावा घेणे ग्रामपंचायतीकडून मदत देणेबाबत विचार करणे.
·         रब्बी हंगामासाठी बियाणांची मागणी करणे वाटप करणे.
·         खरीप हंगामासाठी खुरपणीचा आढावा घेणे.
·         स्तनपान सप्ताहाचा आढावा घेणे अहवाल पाठविणे.
·         राष्ट्रीय  सकस आहार सप्ताह (1 ते 7 सप्टेंबर) साजरा करणेबाबत नियोजन करणे.
·         गावातील बचतगटांची प्रतवारी करणे गटास प्रगतीबाबत मार्गदर्शन करणे.
·         खरीप हंगाम तालुका, जिल्हा, राज्य पातळी पीक स्पर्धकांचे 15 ऑगस्ट पूर्वी अर्ज पाठविणे.
·         खरीप हंगाम पीक कापणी प्रयोगाचे तक्ते 15 ऑगस्ट पूर्वी पाठविणे.
·         11व्या वित्त आयोगातून ग्राम हद्दीत चालू असलेल्या कामाचा आढावा घेणे.

डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन