या
महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 सप्टेंबर – पोषण आहार सप्ताह 1
ते 7 सप्टेंबर; 2 सप्टेंबर – अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी; 5 सप्टेंबर – शिक्षक दिन; 8 सप्टेंबर – जागतिक
साक्षरता दिन, लहान मुलींचा दिवस; 15 सप्टेंबर – अभियंता दिन;
16 सप्टेंबर – जाबितक वायू दिन; 17 सप्टेंबर –
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; 21 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय
शांतता दिन; 22 सप्टेंबर – हिन्दी दिन; 27 सप्टेंबर – पर्यटन दिन; 30 सप्टेंबर – ज्येष्ठ
नागरिक दिन
·
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता
अभियान राबविण्याच्या दृष्टिने
नियोजन करणे.
- इंदिरा
आवास घरकुलांचे मंजूर आदेशाप्रमाणे
कामे सुरु करणे.
उदाहरणदाखल ठराव :
ग्रामसभा ठराव क्रं. 214 दि. 1.5.2004 नुसार 4 लाभार्थींचे प्रस्ताव इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी जिल्हा ग्राम विकास यंत्रणेकडे पाठविण्यात आले होते. यास मंजूरी मिळाली आहे. मंजूर घरकुले सुरु करण्यास लाभार्थींस कळावावे व नियमानुसार अग्रिम देण्यात यावे यास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर. सूचक - कनप, अनुमोदक रासप.
·
ग्रामपंचायत फंड, आमदार
फंड,
खासदार फंड, जिल्हा परिषद
व पंचायत समितीने मंजूर केलेले
विकास कामे सुरु करणे.
·
दारुबंदी सप्ताह साजरा
करणेबाबत विचार करणे.
·
ग्राम पंचायत मालकी
जमीन व गायरान येथील
गवत व पिकांचा लिलाव
करणे.
·
शिक्षक दिन, साक्षरता दिन, पोषण
सप्ताहात ग्राम पंचायतीचा सहभाग
इ. चा आढावा घेणे.
·
दृष्टिदोष व दृष्टिहीनांची
यादी तयार करणे व प्राथमिक
आरोग्य केंद्राकडे पाठविणे.
·
1
ते
7 ऑक्टोबर वनजन्य सप्ताह साजरा
करण्याबाबत कार्यक्रम आखणे.
·
वनराई बंधारे बाबत
कार्यवाही करणे व आढावा
घेणे.
·
अंगणवाडी व प्राथमिक
शाळेतील बालकांच्या आरोग्य तपासणी
कार्यक्रमाचा आढावा घेणे.
·
महिला व बाल
कल्याण, समाजकल्याण विभागाचे वैयक्तिक योजनेचे
लाभार्थी निवडणे.
·
बाल मृत्यूचा व कुपोषित
बालकांचा आढावा घेणे.
·
2
ऑक्टोबर एकात्मिक बाल विकास
सेवा योजना दिन साजरा, महात्मा
गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी
करण्याबाबत नियोजन करणे.
·
जिल्हा ग्राम निधीतून
कर्ज काढले असल्यास त्याचा
हप्ता भरणे.
·
गावात परसबागांची निर्मिती
करणे व कुटुंबांना प्रोत्साहन
देणे.
·
ग्राम शिक्षण समिती
व आरोग्य समितीच्या अहवालावर चर्चा
करणे.
डॉ. भारत भुषण, पर्यावरण व
विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे
डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे,
महाराष्ट्र शासन