या
महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 ऑक्टोबर – स्वेच्छा रक्तादान
दिन, वन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टोबर; 2 आक्टोबर –
ग्रामसभा, म. गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती, कुष्ठरोग सप्ताह 2 ते 7 ऑक्टोबर,
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2 ते 31 ऑक्टोबर, एकात्मिक बाल विकास सेवा
योजना दिन; 4 ऑक्टोबर- राष्ट्रीय एकात्मता दिन, जागतिक
पशूसंवर्धन दिन; 9 ऑक्टोबर – जागतिक टपाल दिन; 11 आक्टोबर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी; 15
ऑक्टोबर – जागतिक अंधदिन; 16 ऑक्टोबर – दारिद्रय निर्मूलन
दिन, जागतिक अन्न दिन; 21 ऑक्टोबर – आयोडिन न्यूनता विकार,
नियंत्रण दिन, पोलिस दिन; 24 ऑक्टोबर – संयुक्त राष्ट्र संघ
दिन; 31 ऑक्टोबर – इंदिरा गांधी स्मृतिदिन, सरदार वल्लभभाई
पटेल जयंती.
-
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता
अभियान प्रभावीपणे राबविणे व अभियानातील
प्रत्येक दिवस साजरा.
उदाहरणदाखल ठराव :
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे नियोजन दि. 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेत केलेले आहे. त्यानुसार कार्यवाही चालू आहे. या अभियानात लोकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने अभियान समितीने प्रयत्न करावेत व त्यांना सर्वांनी सहकार्य करावे.
ठराव सर्वानुमते मंजूर. सूचक - कनप, अनुमोदक रासप
·
ग्राम पंचायत कर वसूली
व पाणी पुरवठा वसूलीचा आढावा
घेणे.
·
कर मागणी बिले
रुजू करुनही ज्या खातेदारांनी
ग्राम पंचायत कर मागणी
प्रमाणे बिले भरली नाहीत
त्यांना मागणी लेखे (रिट बिले)
काढणे.
·
पाणी पुरवठा देखभाल
दुरुस्ती बाबत चर्चा.
·
स्ट्रीट लाईटचे बल्ब, स्ट्रीट
लाईट टयूब दुरुस्ती करुन
घेणे.
·
14
नोव्हेंबरला बाल दिन साजरा
करणेबाबत विचार करणे.
·
संपूर्ण ग्रामीण स्वच्छता
अभियानात सातत्य राहण्याच्या दृष्टिने
नियोजन करणे.
·
गाजर गवत निर्मूलन
कार्यक्रम हाती घेणे व कंपोस्ट
गांडूळ खत प्रकल्प हाती
घेणे.
·
गावाच्या हद्दीतील वृक्षांची
गणना करुन त्याची नोंदणी
करणे व रजिस्टर ठेवणे.
·
पाणी टंचाईचा आढावा
घेऊन प्रपत्र अ साठी
पंचायत समितीकडे पाठविणे.
·
कर्ज परत फेडीचा
आढावा घेणे व कर्जवसूलीसाठी
बँकांना सहकार्य करणे.
·
वन्यजीव सप्ताह साजरा
करणे.
·
कराची फेर आकारणी करावयाची
असल्यास प्रसिध्दी देणे व हरकती
मागविणे.
·
पीक कापणी प्रयोगाचे
अंतिम तक्ते पाठविणे.
·
पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाचा
कच्चा आराखडा तयार करणे.
·
चालू आर्थिक वर्षात
पुरवणी अंदाजपत्रकाची आवश्यकता
असल्यास पुरवणी बजेट तयार
करुन त्यास मान्यता घेणे.
·
14
नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर सहकार
सप्ताह साजरा करण्याबाबत नियोजन
करणे.
·
वनराई बंधारे बाबत
आढावा घेणे.
डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,
पुणे
डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे,
महाराष्ट्र शासन