पंचायत पंचांग -- नोव्हेंबर

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
2 नोव्हेंबर – औद्योगिक सुरक्षा दिन; 14 नोव्हेंबर – बालदिन व पंडित जवाहरलाल नेहरू जयंती, सहकार सप्ताह 14 ते 21 नोव्हेंबर; 17 नोव्हेंबर – लाला लजपतराय पुण्यतिथी; 19 नोव्हेंबर – नागरिक दिन; 21 नोव्हेंबर – महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन; 26 नोव्हेंबर – जागतिक महिला अन्याय निवारण दिन; 28 नोव्हेंबर – महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी.

·         पुढील आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक ग्रामसभेपुढे ठेवणे.

-          ग्रामपंचायत उत्पन्नाच्या 15 टक्केमधून मागासवर्गीय कल्याणासाठी खर्च करणे
उदाहरणदाखल ठराव :
ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून 15 टक्के खर्च मागासवर्गीय कल्याणावर करणेचे आहे. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकात रु. 10,000/- ची तरतूद करण्यात आलेली आहे.  मागासवर्गीय वस्तीत समाजमंदिर दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक बनविण्यात आलेले आहे.  हे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे.  प्रस्तावित कामास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप

·         ग्रामसभा (नोव्हेंबर) समोरील विषयावर मासिक सभेत चर्चा.
·         ग्राम पंचायत उत्पन्नातून मागणीनूसार नवीन कामास मान्यता देणे.
·         रब्बी हंगाम पीक स्पर्धेची कार्यवाही करणे.
·         ज्या ग्राम पंचायतीची फेर आकारणीची मुदत संपली आहे, त्या ग्रामपंचायतीने घरपट्ठी, दिवाबत्ती, आरोग्य कर,   पाणीपट्टी इ. कराचे दर ठरवून हरकती मागविणे.
·         पिक संरक्षण मोहिम, किड रोग व्यवस्थापन पध्दती यावर चर्चा करणे उपाय योजना आखणे.
·         कुटुंब कल्याण कार्यक्रम लसीकरणांचा आढावा घेणे.
·         वनीकरणासाठी जागेची निवड करणे.
·         पीक कापणी प्रयोगाचे अहवालावर चर्चा करणे.
·         सामाजिक वनीकरण यावर चर्चासत्र घेणे लोकसहभाग वाढविणे.
·         1 डिसेंबर एड़स दिन एड़स सप्ताह साजरा करणेबाबत नियोजन करणे.
·         संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मूल्यमापनाची तयारी करणे आढावा घेणे.
·         एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा आढावा घेणे.
·         अपूर्ण कामांचा आढावा घेऊन कामे पूर्ण करण्याचे नियोजन करणे.


डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन