पंचायत पंचांग -- डिसेंबर

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 डिसेंबर 2016 – जागतिक रक्कम प्रतिबंधक दिन, एडस जागृती सप्ताह 1 ते 7 डिसेंबर; 5 डिसेंबर – जागतिक आर्थिक व सामाजिक विकास दिन; 6 डिसेंबर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी; 7 डिसेंबर – ध्वजदिन; 10 डिसेंबर – मानवी हक्क दिन, राष्ट्रीय सेवा दिन; 20 डिसेंबर – संत गाडगेबाबा पुण्यतिथी; 23 डिसेंबर – किसान दिन; 24 डिसेंबर – भारतीय ग्राहक दिन; 27 डिसेंबर – कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख जयंती; 29 डिसेंबर – भारत जोडो दिन

·         पुढील वर्षाचे अंदाजपत्रकास मासिक  सभेत अंतिम मंजूरी देणे पंचायत समितीकडे पाठविणे.
·         रब्बी हंगामाचा आढावा घेणे. रब्बी हंगामामध्ये कर्जदार बिगर कर्जदार यांना सामावून घेणे.
·         उन्हाळी हंगामा करीता बी-बियाणे, खते इ. मागणी करणे.
·         बोरफळाचा लिलाव करणे.
·         ग्रामपंचायत तळयातील माशांचा लिलाव जाहीर करणे.
·         सुधारीत चुली बसविणे वापराबाबत लाभार्थींना प्रशिक्षण देणे.
·         गावाच्या हद्दीतील बांधकाम इतर विकास कामाचे  'कार्यान्वीत यंत्रणा' म्हणून कामाची मागणी करणे कामे मुदतीत करणे यावर चर्चा करणे.
·         ग्राम पंचायत लेखा परिक्षणाची आक्षेपांची पूर्तता करुन  मंजूरी घेणे.
·         नवीन फेर आकारणी दराबाबतचे हरकती विचारात घेऊन नवीन आकारणीचे दर कायम करणे.
·         26 जानेवारीचे कार्यक्रमासाठी खर्चाची मंजूरी घेणे, जादा खर्चास मंजूरी मागणे.
·         गावठाणातील रस्त्यांचा सर्व्हे करणे नमूना नं. 26 वर नोंद घेणे.

-          भूजल अधिनियमांची माहिती देणे आढावा घेणे.
उदाहरणदाखल ठराव :
महाराष्ट्र शासनाच्या भूजल अधिनियमांची माहिती ग्रामसेवकांनी दिली.   अबक  यांनी ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी शेजारी  100 मिटरवर बोअर घेतली आहे.  त्यांनी भूजल अधिनियमाचा भंग केलेला आहे.  याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना देणेसाठी ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप

·         विविध शासकीय योजनेच्या कर्ज वसूलीचा आढावा घेणे.
·         हरियाली कार्यक्रमाबाबत माहिती घेणे ग्रामसभेच्या मान्यतेने सहभागी होण्याचा निर्णय घेणे. 
·         7 डिसेंबर 'ध्वजदिनसाजरा करणे.
·         रब्बी हंगाम तालुका, जिल्हा राज्य पातळी  पीक स्पर्धांचे अर्ज पाठविणे.
·         रब्बी हंगाम पीक कापणी प्रयोगासाठी शेतीची निवड करणे.
·         पल्स पोलिओ मोहिमेस प्रसिध्दी देणे लसीकरणाचा आढावा घेणे.

डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन