पंचायत पंचांग -- जानेवारी

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 जानेवारी 2016 – नवीन वर्ष दिन; 3 जानेवारी – स्त्री मुक्ती दिन व सावित्रीबाई फुले जयंती; 6 जानेवारी – पत्रकार दिन; 10 जानेवारी – नागरिक हास्य दिन; 11 जानेवारी – लाल बहादूर शास्त्री स्मृती दिन; 12 जानेवारी – युवक दिन, स्वामी विवेकानंद जयंती; 23 जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती; 25 जानेवारी – महिला ग्रामसभा; 26 जानेवारी – ग्रामसभा भारतीय प्रजासत्ताक दिन;  28 जानेवारी – लाला लजपतराय जयंती; 30 जानेवारी – राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी, हुतात्मा दिन, कुष्ठरोग निवारण दिन.


·         26 जानेवारी ग्राम सभेपुढील विषयांची चर्चा करणे.
·         ग्रामपंचायत कर भरणाऱ्यां विरुध्द जप्तीसाठी कारवाई करुन जप्तीने कर वसूल  करणे.
·         चिंचेच्या फळांचा लिलाव करणे.
·         प्रजासत्ताक दिनी विविध उपक्रम राबविणे, सत्कार कार्यक्रम ठरविणे याबाबत चर्चा.
·         पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणी अहवालावर चर्चा करणे.
·         सर्व शिक्षण अभियान, महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचा आढावा घेणे.
·         अतिक्रमणाचा आढावा घेणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करणे.
·         नवीन कर आकारणीची कच्ची यादी प्रसिध्द करुन त्यावर हरकती मागविणे.
·         जवाहर ग्राम समृध्दी योजनेतील कामाच्या मूल्यांकनाचा आढावा घेणे.
·         पल्स पोलिओ मोहिमेबाबत जनजागृती करणे.
·         कुष्ठरोग निवारण सप्ताह राबविणे कुष्ठरोगी शोधून काढणे.
·         ग्रामपंचायतीने वार्षिक अर्थसंकल्प तयार केलेला नसल्यास ग्रामसेवकाने अर्थ संकल्प तयार करुन पाठविणे.

-          ठिबक सिंचन तुषार सिंचन लाभार्थी प्रस्ताव पाठविणे.
उदाहरणदाखल ठराव :
ठिबक सिंचन या योजनेसाठी 5 शेतकरी तुषार सिंचन  या योजनेसाठी 4 शेतकरी यांनी अर्ज केलेला आहे.  त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदकडे पाठविण्यास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप

·         बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यासाठी उपाय योजना करणे.
·         गांडूळखत, कंपोस्ट खत प्रकल्प आढावा घेणे.


डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन