पंचायत पंचांग -- फेब्रुवारी

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
2 फेब्रुवारी 2016 – जागतिक जल भूमी दिन; 5 फेब्रुवारी – मौखिक आरोग्य दिन; 14 फेब्रुवारी – शेतकरी दिन; 15 फेब्रुवारी – पाणलोट दिन; 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती; 21 फेब्रुवारी – संत गाडगे महाराज जयंती; 24 फेब्रुवारी – क्षयरोग नियंत्रण दिन; 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन.

-          8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे नियोजन करणे.
उदाहरणदाखल ठराव :
8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आहे. यावेळी महिला मेळावा, महिलांच्या विविध स्पर्धा, महिला प्रशिक्षण इ. कार्यक्रम घेण्यात यावे यासाठी होणारा खर्च ग्रामनिधीतून करणेस ही सभा मान्यता देत आहे. 
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप

·         महिला सक्षमीकरणाकरीता क्षमता बांधणी, विविध व्यवसायासाठी मदत इ. बाबत आराखडा तयार करणे अंमलबजावणी करणे.
·         नवीन बांधलेल्या घरांची यादी प्रसिध्द करणे.
·         मातीचे नमूने परिक्षणासाठी पाठविणे.
·         जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक योजनेच्या मंजूर केलेल्या लाभार्थींस  भत्ता वाटप आढावा घेणे.
·         पिण्याच्या पाण्याचा सद्यस्थितीचा आढावा घेणे टंचाई असल्यास नियोजन करणे.
·         ग्राम पंचायतीने हाती घेतलेल्या तसेच जवाहर ग्राम समृध्दी योजना, घरकुले, विकास कामे इ. कामे पूर्ण करण्याच्या दृष्टिने पाठपुरावा करणे.
·         रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची मागणी करणे मंजूर नोंदणी करणे.  जलसंधारणाची कामे रोजगार हमी योजनेतून सुचविणे.
·         अपूर्ण कामाचा आढावा घेणे पूर्ण करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करणे.
·         बोअर विद्यूत पंप वर्गणी जिल्हा परिषदेकडे भरणे.
·         शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरविणे
·         नविन बांधलेल्या घरांच्या नोंदीची त्यावरील कर आकारणीची यादी प्रसिध्द करणे.
·         कर वसूल करणे, टाळाटाळ करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करणे.
·         अपंगांचे सर्वेक्षण करणे, अपंगत्व  प्रतिबंधात्मक कार्यक्रमाची माहिती घेणे अंमलबजावणी करणे. 
·         चालू आर्थिक वर्षात मंजूर अंदाजपत्रकापेक्षा जादा खर्चाचे पुनर्विनियोजन पत्रकास मंजूरी घेणे.


डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन