पंचायत पंचांग -- मार्च

या महिन्यात बैठकीसाठी उपयुक्त तारखा-
1 मार्च 2016 – नागरी संरक्षण दिन; 8 मार्च – जागतिक महिला दिन; 10 मार्च – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन; 15 मार्च – गोवर लसीकरण दिन, जागतिक ग्राहक दिन; 20 मार्च – जागतिक अपंग दिन;  21 मार्च – जागतिक वनदिन; 22 मार्च – जागतिक जल दिन; 23 मार्च – जागतिक हवामान दिन; 24 मार्च – जागतिक क्षयरोग नियंत्रण दिन; 27 मार्च – महाराष्ट्र अवयव रोपण दिन; 28 मार्च – जागतिक रंगभूमी दिन.

·         आरोग्य दिन (7 एप्रिल), समतादिन (14 एप्रिल), वसुंधरा दिन (20  एप्रिल) साजरा करणे.

-       मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला समिती मार्फत शिबीर घेणे
उदाहरणदाखल ठराव :
गटविकास अधिकारी यांनी आपल्या गावी मोफत कायदेविषयक शिबीर घेण्याचे सूचविले आहे.  या शिबीरामुळे ग्रामस्थांना कायद्याची माहिती मिळेल.  सदरचे शिबीर आयोजित करण्यास व मोठया प्रमाणात प्रसिध्दी देऊन यशस्वी करण्यास ही सभा मान्यता देत आहे.
ठराव सर्वानुमते मंजूर.  सूचक - कनप, अनुमोदक  रासप

·         नवीन फेर आकारणी यादीवरील आलेल्या हरकतीचा विचार करुन फेर आकारणी कायम करणे.
·         31 मार्च अखेर पूर्ण करावयाच्या कामाचा आढावा त्या दृष्टिने कार्यवाही करणे.
·         वन विभागाची परवानगी घेऊन जाहीर केलेल्या वटलेल्या झाडांचा लिलाव करणे.
·         शेणखत, केर कचरा व निकामी साहित्याचा लिलाव करणे.
·         पिण्याची पाण्याची टाकी व परिसर स्वच्छ करणेबाबत.
·         ग्रामपंचायत कराची वसूली 100 टक्के बाबत आढावा घेऊन कार्यवाही करणे.
·         समता पंधरवाडा साजरा करण्याबाबत विचार करणे व नियोजन करणे. 
·         पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा घेऊन टंचाई निवारणार्थ उपाय योजना करणे.
·         अंदाजपत्रकास  मंजूरी मिळालेली कामे पूर्ण करणे.
·         पूर्ण झालेल्या बांधकामाच्या नोंदी नमूना नंबर 26 मध्ये करणे.
·         ग्रामपंचायतीने उत्पन्नाच्या 15 टक्के मागासवर्गीय कल्याणावर व 10 टक्के महिला  व बाल कल्याणावर 100 टक्के खर्च झाल्याची खात्री करणे.
·         भूजल अधिनियमान्वये अंमलबजावणी चालू असल्याचा आढावा घेणे.
·         वीज चोरीवर आळा बसण्याच्या दृष्टिने प्रयत्न करणे,  वीज प्रकाश योजना व इतर सवलतींच्या योजनेची माहिती घेणे.


डॉ. भारत भुषण, पर्यावरण व विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे

डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, भाप्रसे, महाराष्ट्र शासन