अनगर,
तालुका – मोहोळ, जिल्हा – सोलापूर.
·
गावातील प्रत्येक व्यक्तीस
वृक्षांचे दत्तक स्वरूपात वाटप व संगोपन.
·
वैयक्तिक बायोगॅस सुरू करून
दैनंदिन ऊर्जेची गरज पूर्ण.
·
स्वयंस्फूर्तीने वैयक्तिक
शौचालयाचे बांधकाम व त्याचा वापर.
·
लोक वर्गणीतून सोलन प्लांट
व पाण्याची टाकी बसवून पाण्याची अडचण दूर.
·
वाड्या वस्त्यांवर सौर
पथदिव्यांची उभारणी.
·
पर्यावरण संतुलित समृद्ध
ग्राम योजनेतून पवनचक्कीचा प्रकल्प उभारून ग्रामपंचातीने संपूर्ण गाव वीजेच्या
बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
अंठीपाडा,
तालुका – नवापूर, जिल्हा – नंदूरबार.
·
महिला बचत गटामुळे गावात
दुग्धव्यवसाय वाढला.
·
गावात एकूण 21 पथदिवे
बसविण्यात आले. त्यातील 17 सीएफएल व चार सौरदिवे आहेत.
·
गावात प्लॅस्टीक बंदी करण्यात
आली आहे.
·
गावात 1650 वृक्षांची लागवड
करून त्याचे संवर्धन करण्यात येत आहे.
बसरापुर,
तालुका – भोर, जिल्हा – पुणे.
·
प्रत्येक विद्युत पथ
दिव्यावर सी.एफ.एल. बल्ब व सौर पथदिव्यांची उभारणी.
·
गोबर गॅस दुरूस्त करण्यात
येवू लागले, नवीन गोबर गॅस व सोलर दिव्याबाबत ग्रामस्थ आग्रही.
भाग्यनगर,
तालुका – खानापूर, जिल्हा – सांगली.
·
पंचायतीने स्वत:च्या जागेवर
500 वृक्ष लावून त्यास ड्रिप गार्ड तयार केले.
धाबा,
तालुका – बार्शीटाकळी, जिल्हा – अकोला.
·
गावात रस्त्याच्या दुतर्फा
तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड. आज रोजी गावामध्ये जिवंत झाडांची संख्या
2500 असून 500 झाडांना लोखंडी ट्री गाडे, 500 झाडांना बांबुचे ट्री गार्ड व
उर्वरित झाडांना काटेरी कुंपण केलेले आहे.
·
प्लॅस्टीक बंदीच्या
प्रचारार्थ ग्राम पंचायतने कापडी पिशव्यांवर पर्यावरण विषयक संदेश छापून त्याचे
वितरण गावातील प्रत्येक कुटुंबाकडे केलेले आहे.
धोरतखेडा,
तालुका – अचलपूर, जिल्हा – अमरावती.
·
गाव निर्मल ग्राम.
·
4125 वृक्षांची लागवड.
धामणेर,
तालुका – कोरेगांव, जिल्हा – सातारा.
·
बांधीव टँकमध्ये गणपतीचे
विसर्जन.
·
सांडपाणी व घनकचरा
व्यवस्थापनावर युनिसेफ मार्फत डॉक्युमेंटरी फिल्म निर्मिती.
गाडेगाव,
तालुका – हिंगणघाट, जिल्हा – वर्धा.
·
गावामध्ये वनराई बंधाऱ्याचा
कार्यक्रम राबविल्यामुळे पाण्याची पातळी वाढुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली.
·
70 टक्के घनकचरा व्यवस्थापन
केल्यामुळे व त्यापासून 50 टक्के खत निर्मिती होऊन उत्पादनात वाढ झाली.
घोडवली,
तालुका – संगमेश्वर, जिल्हा – रत्नागिरी.
·
सी.एफ.एल./ एल. ई.डी.
बल्बचे आयुर्मान जास्त असल्यामुळे आर्थिक बचत होते हे ग्रामस्थांना
प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिल्यानंतर या बल्बचा वापर वाढला. ही योजना यशस्वी झाली असून आता ती ग्रामपंचायत
कार्यक्षेत्रामध्ये लोक चळवळ म्हणून राबविण्याचे ठरले आहे.
पाटोदा,
तालुका – औरंगाबाद, जिल्हा – औरंगाबाद.
·
गावात सी. एफ. एल. व 15 सौर
संच ऊर्जेचे बसविण्यात आले.
·
बँकेचे अर्थसहाय्य घेऊन
लोकांनी स्वत: 30 सोलरहिटर बसविले आहेत.
हातनूर,
तालुका – तासगांव, जिल्हा – सांगली.
·
गावात 25 ठिकाणी सौर ऊर्जा
दिवे.
·
ग्रामपंचायत कार्यालयावर 1
किलो वॅट विज निर्मितीची पवन चक्की असून त्याचा वापर ग्रामपंचायत कार्यालय व
स्ट्रिट लाईट साठी घेतला जातो.
हत्तलवाडी,
तालुका – मानवत, जिल्हा – परभणी.
·
निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त
झाला.
नसडगाव,
तालुका – जालना, जिल्हा – जालना.
·
गावामध्ये 27 सौरपथदिवे
आहेत त्याचप्रमाणे 47 दारिद्रयरेषेच्या कुटुंबाकडे सौरदिवे आहेत. सदर कामांचा खर्च
पुरस्कारातुन प्राप्त बक्षीस रकमेतून रू. 7.50 लक्ष करण्यात आला आहे.
·
1054 वृक्षांची लागवड केली
असून 100% प्लास्टीक बंदी व
शौचालय वापर केलेला आहे.
·
म. ग्रा. रो. ह. यो.
अंतर्गत 5000 वृक्षांची रोपवाटीका हाती घेतलेली आहे.
हिवरेबाजार,
तालुका – अहमदनगर, जिल्हा – अहमदनगर.
·
गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन
न करता प्रतिकात्मक मुर्तिचे विसर्जन पिण्याच्या पाण्यासाठी वापरात नसलेल्या
विहिरीत करण्यात येते. निर्माल्याचा वापर कंपोस्ट खतासाठी केला जातो.
·
एक मुल एक झाड, बाल
वृक्षमित्र पुरस्कार दर वर्षी विद्यार्थ्यांना दिला जातो.
कळस,
तालुका – पारनेर, जिल्हा – अहमदनगर.
·
25 कचराकुंड्या खरेदी करून
चौकाचौकात मंदीर परिसर वर्दळीच्या ठिकाणी व शालेय परिसरात ठेवण्यात आल्या आहेत.
संकलीत झालेल्या कचऱ्याद्वारे गांडूळ खत निर्माण केले जाते व या खताच्या
विक्रीद्वारे ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू लागले आहे.
कांदळी,
तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणे.
·
बचत गटाला कापडी पिशव्या
बनविणेसाठी रोजगार मिळाला.
काळवाडी,
तालुका – जुन्नर, जिल्हा – पुणे.
·
पर्यावरण संतुलित समृद्ध
ग्राम योजनेअंतर्गत 4285 वृक्ष लागवड केली. त्यापैकी आज अखेर 3636 जिवंत वृक्ष
आहेत. सर्व झाडांना टॅगींग केले आहे. वृक्ष लागवड रजिस्टर अद्यावत ठेवले आहे.
·
50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडी
असणाऱ्या प्लॅस्टीक पिशव्या वापरावर गावात बंदी केलेली आहे व कागदी पिशव्यांचा
वापर सुरू झालेला आहे.
·
अपारंपारिक ऊर्जा
स्त्रोतांमध्ये गावात 62 बायोगॅस, 5 सौरपथके, 15 सौर कंदिल याचा वापर चालू
झालाआहे. तीन सोलर हिटर व स्ट्रिट लाईटवर सी. एफ. एल. बल्ब बसबिले आहेत.
खापरखेडा,
तालुका – वसमत, जिल्हा – हिंगोली.
·
50टक्के मायक्रॉन पेक्षा
कमी जाडी असलेल्या पिशव्यांना बंदी.
·
सततच्या मार्गदर्शनामुळे
ग्रामसभांमध्ये पुरूष लोकांबरोबरच महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ.
कोरेगांव,
तालुका – वाळवा, जिल्हा – सांगली.
·
घंटागाडीद्वारे गावातील
कचरा एकत्र करून त्याचे कंपोस्टीग करण्यात येते. गाव पूर्णपणे प्रदुषण मुक्त.
·
100 टक्के घरांना गटार
व्यवस्था असून सर्व सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी भाड्याने
देवू केले असून ग्रामपंचायत उत्पन्नात भर पडली आहे.
कुडोशी,
तालुका – साक्री, जिल्हा – धुळे.
·
गाव निर्मलग्राम झाले आहे.
·
रस्त्याच्या कडेला लावलेले
वृक्ष विद्यार्थ्यांनी दत्तक घेवून ट्री गार्डवर त्यांची नावे नोंदविण्यात आली
आहेत. सर्वात जोमाने वृक्षसंवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्याला 15 ऑगस्ट रोजी रोख
रकमेचे बक्षीस देवून गौरविण्यात येते.
·
वीज बचतीसाठी 92 खांबांवर
सी.एफ.एल. दिवे बसविले आहेत.
लिंबगाव,
तालुका – उदगीर, जिल्हा – लातूर.
·
एक गाव एक गणपती संकल्पना
राबविण्यात येत आहे.
·
गावात 2 सौर ऊर्जा पथदिवे
बसविण्यात आले.
मान्याचिवाडी,
तालुका – पाटण, जिल्हा – सातारा.
·
ग्रामपंचायत आयएसओ मानांकीत
आहे.
·
51 व्यक्तींचा नेत्रदान
संकल्प, 3 व्यक्तींचा देहदान संकल्प.
·
सेंद्रिय शेतीचा प्रयोग.
पिंगुळी,
तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग.
·
प्रति कुटुंबाला प्रति
महिना एक बायोगॅस सिलेंडर याप्रमाणे 152 सिलेंडर्सची व रूपये 60000/- पेक्षा जास्त
आर्थिक बचत होते.
·
100 टक्के मीटर पद्धतीने
पाणी पुरवठा करण्यात येवून नळ पाणी पुरवठा बीलांचे संगणकीकरणे केले आहे.
राजना,
तालुका – चांदुर रेल्वे, जिल्हा – अमरावती.
·
वृक्षलागवड 1645.
·
महिला सभागृहामध्ये सौर
अभ्यासिका.
सावळे,
तालुका – पनवेल, जिल्हा – रायगड.
·
ग्राम पंचायतीने घंटागाडी
सुरू करून प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडी दिली आहे.
·
ओला कचरा व सुका कचरा साठी
मोठ्या कचरा कुंड्या प्रति दहा घरामागे एक दिल्या आहेत.
·
प्लॅस्टीक बंदी कायम ठेवून
ग्रामस्थांना कागदी व कापडी पिशव्या वापरण्यासाठी प्रोत्साहीत करण्याकरीता ग्राम
पंचायतीने पहिल्या टप्प्यात 750 कापडी पिशव्या पर्यावरणाच्या संदेशासह तयार करून
ग्रामस्थांना वाटल्या आहेत.
शीर,
तालुका – गुहागर, जिल्हा – रत्नागिरी.
·
गावात महिलांचे 17 बचतगट
स्थापन होऊन त्यांनी खेळते भांडवल तसेच सिंचनासह भाजीपाला व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात
कर्ज घेवून सुमारे 10 हेक्टर पडीक जमिनीवर विधि शेती उत्पादने घेण्यास सुरूवात
केली आहे.
शिवनी,
तालुका – लाखणी, जिल्हा – भंडारा.
·
गावातील एकूण 252
कुटुंबापैकी 132 कुटुंबाकडे बायोगॅस प्रकल्प तयार करून त्याचा वापर योग्य प्रकारे
करण्यात येत आहे.
·
नॅडेप पद्धतीने गावात
निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मितीचे काम करण्यात येत आहे.
तांडे,
तालुका – एरंडोल, जिल्हा – जळगाव.
·
वीट भट्टी व्यवसायासाठी
सांडपाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. त्यापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न प्राप्त
होत आहे.
·
गावात उकिरड्यांची व
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खड्उे खोदून त्यात कचरा टाकून कंपोस्ट खत तयार
केले जाते.
वागदेव,
तालुका – मेहकर, जिल्हा – बुलडाणा.
·
गावात प्लॅस्टीक सापडल्यास
रू. 200/- दंड, बाहेरील व्यक्तीस टोपली भर कचरा सापडल्यास रू. 500/- बक्षीस योजना ग्रामसभेच्या
माध्यमातून सुरू करण्यात आली.
वझर,
तालुका – खामगांव, जिल्हा – बुलडाणा.
·
निर्मल ग्राम.
·
6000 वृक्ष लागवड.
येलूर,
तालुका – वाळवा, जिल्हा – सांगली.
·
पहिल्या वर्षी 7000 वृक्ष
लागवड, म.ग्रा.रो.ह.यो.तून 20000 रोपांची नर्सरी.
राजगड,
तालुका – मुल, जिल्हा – चंद्रपूर.
·
40000 रोपांची नर्सरी तयार
केली, औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड.
·
गावात 305 कुटुंबाकडे पक्के
शौचालय.
·
10 सौर उर्जेचे पथदिवे,
सर्व 50 पथदिव्यांना सीएफएल बल्ब.
·
गावातील सर्व अंतर्गत रस्ते
सिमेंट काँक्रीटचे.
रावळगुंडवाडी,
तालुका – जत, जिल्हा – सांगली.
·
गावामध्ये कचरा गोळा
करण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वत:ची घंटागाडी घेतली आह. त्याद्वारे गावातला कचरा
दररोज गोळा केला जाते व गोळा केलेल्या कचऱ्यापासून गांडूळ खतनिर्मिती केली जाते.
कसारी
(तृ), तालुका – देसाईगंज, जिल्हा – गडचिरोली.
·
पर्यावरणात सहभागी होण्याचा
विडा उचलला आणि पहिल्याच वर्षात 60% वसूली
करून 1006 वृक्ष लागवड केली.
·
नंतर 100 टक्के करवसूली
करून, लोकसंख्येपेक्षा जास्त वृक्ष लागवड करून व 100 टक्के शौचालय बांधून
जनतेमध्ये एक नवा विश्वास निर्माण झाला.
·
म. रा. ग्रा. रो. हे. योजने
अंतर्गत रोपवाटीकेत 5000 रोपे तयार झाली.
काष्टी,
तालुका – मोखाडा, जिल्हा – ठाणे.
·
गावात एक घर एक बदाम एक
पेरू फळझाडे लावून त्यांचे संरक्षण व संवर्धन कुटुंबांना दत्तक देण्यात आले.
·
विविध मुर्तींचे व
निर्माल्य वस्तुंचे पर्यावरण पूरक विसर्जनासाठी कृत्रीम तळे तयार करण्यात आले
आहेत.
किकवारी
खु, तालुका – बसमत, जिल्हा – हिंगोली.
·
गावात 106 हेक्टर
क्षेत्रावर वनीकरण झालेले आहे.
·
गावात लोकसहभागातून अनेक
प्रकारचे वनराई बंधारे, सीसीटी, अर्धनस्ट्रक्चर, भूमीगत बंधारे, मातीबांध व
जंगलसंवर्धन करून पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम राबवले आहेत.
लोणी,
तालुका – राहाता, जिल्हा – अहमदनगर.
·
गावात लोकसंख्येच्या
प्रमाणात म्हणजे 13400 झाडे लावलेली आहेत.
नशिरपूर,
तालुका – मोशी, जिल्हा – अमरावती.
·
गावामधील 100 टक्के घरांना
शिवकालीन पाणी साठवण योजने अंतर्गत घरांच्या छताचे पाणी जमिनीमध्ये पुनर्भरण
करण्यात आलेले आहे.
नांदुर,
तालुका – आंबेगाव, जिल्हा – पुणे.
·
महिला बचतगटाच्या
माध्यमातून रोपवाटिका.
तायघाट,
तालुका – महाबळेश्वर, जिल्हा – सातारा.
·
शेताचे बांधावर घराचा परिसर
यामध्ये श्रमदान करून एकूण 1445 इतकी एक व्यक्ती तीन झाडे या प्रमाणे वृक्ष लागवड
करून लोक सहभागातून वृक्षसंवर्धन करण्यात आलेले आहे.
शेळगाव-गौरी,
तालुका – नायगांव, जिल्हा – नांदेड.
·
पोळ्याच्या सणाच्या दिवशी
पशु वैद्यकिय अधिकाऱ्यांना बोलावून गावातील सर्व गुरांची तपासणी करून लसीकरण केले
जाते व पशु प्रदर्शन भरविले जाते.
ही माहिती ग्रामविकास
विभाग, महाराष्ट्र शासन यांचेतर्फे प्रकाशित पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम
योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींची यशोगाथा – पर्यावरणरत्न 2011 या पुस्तिकेमधून
घेतली आहे.